इतर

कंपनीत पंखा लावत असताना विजेचा धक्का; कामगाराचा मृत्यू

कंपनीत पंखा लावत असताना विजेचा धक्का; कामगाराचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी l औद्योगिक वसाहतीतील एका चटई कंपनीत पंखा लावत असताना विजेचा धक्का लागून अनिल बारेला (मूळ राहणार मध्यप्रदेश) या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अनिल बारेला हे काही काळापासून जळगावातील औद्योगिक वसाहतीमधील एका चटई कंपनीत काम करत होते. बुधवारी सकाळी कामाच्या ठिकाणी पंखा लावत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. आजूबाजूला असलेल्या कामगारांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने अनिल यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून आवश्यक कारवाई केली. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button