इतर

जळगावत महिलेने घेतला गळफास

जळगाव ;- एका ३१ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १७ रोजी रात्री हरिविठ्ठल नगर भागात घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सपना उर्फ स्वप्ना जगदीश भोई (वय-३१) रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव असे मयत महिलेचे नाव आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरात सपना जगदीश भोई या महिला एकट्याच राहत होत्या. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. त्यांच्या घराच्या मागच्या गल्लीत त्यांची बहिण मंगलाबाई ढोले हे देखील राहतात. मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी सपना भाई ह्या घरी एकट्या असतांना त्यांनी साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यानंतर रात्री ९ वाजता त्यांची बहिण मंगलाबाई ढोले या सपनाच्या घरी आल्या.त्यावेळी घराचा मुख्य दरवाजा लोटून बघितले असता त्यांना बहिणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी एकच आक्रोश केला होता. शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी घटना स्थळी जाऊन मृतदेह खाली उतरविला. खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंखे यांनी मयत घोषीत केले. याबाबत रामानंद नगरपोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ हेमंत कळसकर करीत आहे.
=====================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button