खान्देशजळगांवशिक्षण

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात फ्रेशर्स फ्रेन्झी उत्साहात

जळगाव – शाळेतून कॉलेजमध्ये पाऊल टाकताना मुलांचा एका नव्या जगात प्रवेश होत असतो. कॉलेज लाईफ मध्ये प्रवेश करताना मुलं काहीशी बावरलेली असतात. या विद्यार्थ्यांना कॉलेजची तसेच सीनियर्सची ओळख व्हावी, यासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी फ्रेशर्स फ्रेन्झी या फ्रेशर पार्टीचे दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ. ईश्वर जाधव ( रजिस्ट्रार), डॉ .नितीन भोळे(प्रमुख,बेसिक सायन्सेस अँड हुम्यानिटी), प्रा. महेश पाटील (विद्युत विभाग प्रमुख), प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), डॉ.अनिलकुमार विश्वकर्मा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स, विभाग प्रमुख) महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी त्यांची गुणवैशिष्ट्ये सादर करावी, जेणेकरून तुमच्या व्यक्तीमत्वात प्रगल्भता येईल. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून परस्पर संबंध व सर्वांगीण विकास वाढत असल्याचे ते म्हणाले. दिवसभराच्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये विद्यार्थ्यांचे सुप्तगुण, आत्मविश्वास तसेच त्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण व्हावी या पद्धतीने वेगवेगळ्या राऊंड्सचे आयोजन करण्यात आले होते. यात मुख्यत: पहील्या फेरी मध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वेगवेगळ्या बाऊलमधून चिठ्ठी काढून त्यात दिलेले टास्क पूर्ण करायचे होते. फिश बाऊल च्या फेरीत पहिल्या वर्षाच्या सर्व मुला- मुलींनी अतिशय आनंदाने सहभाग नोंदवला. तद्नंतर दुसर्‍या फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना रॅम्प वॉक करून काही प्रश्नांची उत्तरे देऊन आपले शारीरीक तसेच बौध्दीक कौशल्य दाखवायचे होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button