भुसावळ प्रतिनिधी :- भुसावळातील रेल्वे ठेकेदाराला स्टील अॅथरटी ऑफ इंडियाचा कर्मचारी असल्याचे भासवून 40 चाळीस लाखांचा चुना लावल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी संशयित विरुद्ध सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
स्टील अॅथरटी ऑफ इंडियाचा कर्मचारी असल्याचेश्रीकांत मिश्रा याने भासवून शहरातील एका कंत्राटदाराकडून लोखंडी सळईचा माल पुरवतो म्हणून वेळोवेळी ऑनलाईन एनएफटीद्वारे पैसे घेऊन तब्बल 40 लाख 96 हजार 920 रुपये घेतले. परंतु मनवानी यांना लोखंडी सळईचा माल न देता आणखी पैशांची मागणी मागणी करीत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी जळगाव सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.