जळगांवसामाजिक

अत्रे वकील फर्मच्या शतकापूर्ती सोहळा उत्साहात..

समाजमनात वकीली क्षेत्राची परंपरा रुजविण्याचा वसा घेतलेले अत्रे कुटूंबीय 

जळगाव l ०५ नोव्हेंबर २०२३ l समाजमनात आपल्या प्रामाणिक, प्रांजळ उद्देशाने वकीली हे क्षेत्र अत्रे कुटूंबीयांनी रुजविले यासह कायदाप्रती जागरुकता केली. ते कायम आपल्या कामाप्रती एकनिष्ठ राहीले. १०० वर्ष त्यांनी आपल्यातील परंपरा ही कायम ठेवत कुटूंबातील सर्व सदस्यांनी हा वसा रुजविला आहे. संपुर्ण महाराष्ट्रात त्यांच्या कार्यप्रणालीची ख्याती असून अत्रे परीवाराचे न्यायदानातील योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.

रविवारी जैन हिल्स परीसरात ‘अत्रे वकील द लॉफर्म’ च्या शतकपुर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. परीचय अॅड. निलीमा संत यांनी करुन दिला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती ए.पी. भंगाळे, विशेष सरकारी वकील उज्वल निकम, अधिवक्ता परीषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मीरा खडक्कर, जैन उद्याेग समुहाचे अध्यक्ष अशाेक जैन, महाराष्ट्र व गाेवा बार कौन्सिल चे माजी अध्यक्ष अॅड. जयंत जायभावे, अत्रे वकील फर्म चे सुशील अत्रे होते. मान्यवरांचा सन्मान प्रतिमा अत्रे, पद‌्मजा अत्रे, अॅड. निशांत अत्रे यांच्याहस्ते करण्यात आला.

प्रसंगी दिप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. तर अत्रे वकील यांच्या शतकपुर्ती निमित्त स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात अाले.यावेळी माजी न्यायमुर्ती ए.पी.भंगाळे म्हणाले की, माझ्या जडणघडणीत अत्रे परीवाराचा खूप माेठा वाटा अाहे. अत्रे बाबा म्हणजेच ज्येष्ठ विधिज्ञ अच्युतराव अत्रे हे अत्यंत हुशार व्यक्तीमत्व हाेते. एखाद्या खून खटल्यात त्यांचे प्रश्न हे मार्मिक असायचे. त्यांना कुठे थांबायचे अचूक माहिती हाेते. त्यांच्या मागे बसून मी त्यांना पाहायचाे की ते कसे उलट तपासणी करतात. त्यांच्याकडूनच मी शिकलाे अाहे. वकीली क्षेत्रात त्यांचे नाव श्रेष्ठ हाेते असे म्हणत त्यांनी अनेक अाठवणींना उजाळा दिला. त्याचप्रमाणे मीरा खडक्कर, जयंत जायभावे यांच्यासह अत्रे परीवारातील ज्येष्ठ विधिज्ञ अशाेक माथुरवैश्य यांनी अापले मनाेगत व्यक्त केले. सुशील अत्रे यांनी यावेळी अापल्या भावना व्यक्त करीत अाठवणींनाही उजाळा दिला. सूत्रसंचालन साेनिका मुजूमदार,  अाभार अॅड. पंकज अत्रे यांनी मानले. यावेळी ‘आत्रेय’ अाश्रम परीवारातील सगळ्यांचे सहकार्य मिळाले.

वकीलीचे विद्यापीठ अत्रे परीवार…
विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी यावेळी सांगितले की, अच्युतराव अत्रे बाबा यांच्याकडून मी खूप काही शिकलाे. खटल्यात समाेरचा अाक्रमक झाल्यास अापण कसे अाक्रमक व्हावे कसे बाेलावे हे त्यांनी मला शिकविले. त्यांनी अनेक कानमंत्र मला दिली. वकीली व्यवसायाला वेगळा अायाम निर्माण करणारे त्यांचे व्यक्तीमत्व हाेते. जनमानसात हे क्षेत्र पाेहाेचविण्याचे कार्य त्यांनी केले. खटल्याचा निकाल हा विरुद्ध लागाे की बाजूने त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव एकसारखे असायचे. यासाठी तुम्ही स्थितप्रज्ञ असायला लागतात. अत्रे बाबा हे त्यातील हाेते जे खुप कमी व्यक्तींमध्ये पाहायला मिळते. द्राेणाचार्य हे गुरु हाेते परंतू एकलव्यचे गुण माहिती झाल्यावर त्यांनी देखील त्याच्याकडे गुरुदक्षिणा म्हणून अंगठा मागितला हाेता पण अामचे अत्रे बाबा हे निस्वार्थ हाेते. अनेक विद्यार्थी त्यांनी निस्वार्थ पणे घडविले. वकीलीचे विद्यापीठ ते हाेते. तर्कशास्त्राने कायद्याचा कसा वापर झाला पाहिजे यावर त्यांनी कायम भर दिला. त्यांच्या पुस्तकांचा तरुणांनी अभ्यास करणे गरजेचे असल्याचेही मत यावेळी निकम याांनी व्यक्त केले.

प्रांजळपणाने कायद्यात तेजस्वी ठसा उमटविलेला परीवार…
सरस्वतीचा वरदहस्त असलेला हा परीवार असून प्रांजळपणाने कायद्यात अापला तेजस्वी ठसा उमटविलेला परीवार असल्याचे मत जैन उद्याेग समुहाचे अध्यक्ष अशाेक जैन यांनी व्यक्त केले. सुवर्णांकीत अक्षराने या परीवाराचा उल्लेख केला जाईल. अापल्या कार्यात प्रामाणिकपणा, सचाेटी त्यांनी कायम जपली अाहे. त्यांच्या परीवारात सुरु झालेली परंपरा अाजही शिस्तीच्या बाबतीत कायम अाहे. प्रत्येकाचे पहिले प्रेम वेगळे असले अत्रे परीवाराचे पहिले प्रेम हे कायदा, वकीली क्षेत्र अाहे. भवरलालजी जैन अाणि अत्रे बाबांची मैत्री ही खूप माेठी हाेती. दाेघांनाही पुस्तकांची अावड. व्यावसायिक नाते हे पारीवारीक यांच्या मैत्रीतूनच बहरले अाहे. अापल्या मैत्रीतील अात्मीयता ही कायम दाेघांनी जपली अाहे. चांगल्या व्यक्तींचे कायम नाेंद हाेते. अाज समाजात चांगले काम करणारे परीवार तीही परंपरागत जपणारे कमी पाहायला मिळतात. त्यापैकी अत्रे परीवार असून समाजात याचे उत्तम उदाहरण असल्याचेही प्रतिपादन करीत अनेक अाठवणींना अशाेक जैन यांनी उजाळा दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button