
भरधाव डंपरने ट्रॅक्टरला धडक दिल्याने झाले पलटी ; सुदैवाने विद्यार्थी बालंबाल बचावले !
अपघातात तरुणाचा मृत्यू ,तीन गंभीर जखमी ; दूध फेडरेशनजवळील घटना
जळगाव I प्रतिनिधी
शहरातील दूध फेडरेशन जवळ विटा वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरला डंपर ने दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून डंपरने ट्रॅक्टरला उडविले असतांना याच रस्त्यावर थोड्याच अंतरावर शालेय विद्यार्थ्यांना सोडणारी व्हॅन उभी होती. सुदैवाने उलटणारे ट्रॅक्टर या व्हॅनला धडकले नसल्याने शालेय विद्यार्थी थोडक्यात बचावल्याची घटना उघडकीस आली आहे . या अपघात प्रकरणी शहर पोलिसांनी डंपर ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. अंकुश आत्माराम भिल वय 27 असे मयत तरुणाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शहरातील दूध फेडरेशन परिसरात असणाऱ्या पेट्रोल पंपा जवळ विटा घेऊन जाणारे ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ ए एन २९०६ ला ओव्हरटेक करण्याच्या नादात असणाऱ्या डंपरने कट मारल्याने ट्रॅक्टर पलटी झाले. या ट्रॅक्टरवर मजूर असलेला अंकुश भील हा ट्रॅक्टर खाली आल्यामुळे तो जागीच ठार झाला. त्याच्यासोबत असणारे इतर सुनील मधुकर भिल वय २२ , गणेश भगीरथ भिल वय १८ आणि शुभम सुखाभिल वय २० तिघे राहणार इदगाव हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती कळतच घटनास्थळी शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन डंपर ताब्यात घेतला. मयत अंकुश यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान या घटनेबाबत उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते.