खान्देशगुन्हेजळगांव

विजेच्या खांबावर चढलेल्या तरुणाचा कोसळून मृत्यू

जळगाव : कंपनीत दुरुस्तीसाठी विजेच्या खांबावर चढलेला असतांना वायर रोप तुटल्यामुळे शिडीवर चढलेला तरुण चेतन सायबासिंह पवार उर्फ (चेतन ज्ञानेश्वर राजपूत) (वय ३०, रा. धुळे) या खांबावरुन खाली कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास एमआयडीसीतील एस सेक्टरमध्ये घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धुळे येथे राहणारा चेतन राजपूत हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. विजेचे पोल उभारण्यासह इलेक्टॉनिक्सचे काम करणाऱ्या खासगी कंत्राटदाराकडे कामाला होता. जळगाव शहरातील एमआयडीतील

एस सेक्टमधील कंपनीत दुरुस्तीचे काम करण्यासाठी चेतन हा आला होता. दुपारच्या सुमारास विजेच्या खांबावरील दुरुस्तीचे काम करण्यासाठी चेतन हा वायर रोप आणि शिडीच्या सहाय्याने खांबावर चढून दुरुस्ती करीत होता. अचानक वायर रोप तुटल्याने चेतन हा उंचावर असलेल्या शिडीवरुन जमिनिवर कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. कंपनीतील कर्मचाऱ्यांसह चेतन सोबत काम करणाऱ्यांनी त्याला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button