खान्देशजळगांवराजकीय

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी आज मतदान; ३० केंद्रांवर ३,०३६ मतदार बजावणार हक्क

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी आज मतदान; ३० केंद्रांवर ३,०३६ मतदार बजावणार हक्क

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार थंडावला असून, आज (रविवार) जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. महायुतीचे १२ उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले असून, उर्वरित जागांसाठी १५ तालुक्यांतील एकूण ३० मतदान केंद्रांवर चुरशीने मतदान होणार आहे.

सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. या निवडणुकीत मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, तर चाळीसगाव मतदारसंघातून आमदार मंगेश चव्हाण हे दिग्गज नेते रिंगणात असल्याने या दोन्ही हायव्होल्टेज लढतींच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मतदानानंतर उद्या, दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून जळगाव शहरातील महाबळ रोडवरील सैनिक कल्याण सभागृहात मतमोजणी होऊन अंतिम निकाल जाहीर केले जातील.

निवडणूक दृष्टिक्षेपात :

  • एकूण मतदान केंद्रे : ३० (१५ तालुके)
  • एकूण मतदार : ३,०३६
  • प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे मतदार : ८८५
  • इतर सहकारी संस्थांचे मतदार : २,१५१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button