जळगाव;- तालुक्यातील शिरसोली येथील मोबाईल टॉवरवरील केबल वायर चोरी केल्याप्रकरणी एका विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रोपाला अटक केली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शिरसोली गावात असणाऱ्या मोबाईल टावरवरील पावर केबल 15 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास संशयित शुभम रोशनलाल कुमार रा. दिल्ली मुरादाबाद हल्ली मुक्काम हॉटेल राज पॅलेस ,नवीन बस स्टॅन्ड यांनी दहा हजार रुपये किमतीची लाल व काळ्या रंगाची 70 एम एम व 32 एम एम जाडीची 21 मीटर अशी एकूण 34 हजार 300 रुपयांची केबल चोरल्याची फिर्याद रवींद्र अरविंद पाटील यांनी दिल्यावरून १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी शुभम कुमार याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल समाधान टहाकळे करीत आहे.