जळगांवशासकीय

ई-सेवांच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा देण्यास महसूल विभाग कटीबध्द – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जिल्ह्यात महसूल सप्ताहास उत्साहात सुरूवात: नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्कृष्ट अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सन्मान

जळगाव l १ ऑगस्ट २०२३ l ई- सेवांच्या माध्यमातून नागरिकांना अधिकाधिक नागरी सुविधांचा लाभ देण्यासाठी महसूल विभाग कटीबध्द आहे‌. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे केले‌‌.‌ जिल्ह्यातील महसूल दिन शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यात महसूल दिनाचे औचित्य साधून सुरू झालेल्या सप्ताहाच्या कार्यक्रमास विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात सुरूवात झाली. सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात महसूल दिनी कार्यक्रमात सप्ताहाची सुरूवात जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांच्या हस्ते झाली‌. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, एम.पी.मगर आदी उपस्थित होते ‌.

श्री.प्रसाद म्हणाले, नागरिकांना महसूलविषयक सुविधा देतांना कमीत कमी मानवी हस्तक्षेपाविना ई-सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. महसूल सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांना अनेक सुविधांचा सहज-सुलभ लाभ मिळणार आहे.

पोलीस अधीक्षक राजकुमार म्हणाले, पोलीस प्रशासन एकमेकांच्या समन्वयातून जिल्ह्याला चांगल्या सेवा प्रदान करण्याचे काम करणार आहोत.

यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी- कर्मचारी यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार जितेंद्र कुंवर, नायब तहसीलदार संभाजी पाटील, देवेंद्र चंदनकर, एस.यु.तायडे या अधिकाऱ्यांचा व अव्वल कारकून संदीप जयस्वाल, वैशाली पाटील अरुण वसावे, अलका पाटील , मंडळाधिकारी दीपक गवई, एम एम फड, अजिंक्य आंधळे, मधुकर पाटील, महसूल सहाय्यक मोनिष बेंडाळे, अमोल चौधरी, रेखा राठोड , तलाठी आबाजी सोनवणे, एन बी सोनवणे, बालाजी लोंढे, चेतन ठाकूर वाहनचालक दिलीप पाटील, शिपाई भागवत कोळी, मुक्ता खोंड, कोतवाल जितेंद्र धनगर, सुकदेव कोठारे यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सन्मान करण्यात आला‌.

जिल्ह्यात महसूल सप्ताहास उत्साहात सुरूवात :

जिल्ह्यात एरंडोल येथे गाव स्तरावर ई-पीक पाहणी, कार्यालयीन स्तरावर साफसफाई स्वच्छता मोहीम राबवण्यात आली‌. जामनेर, रावेर, यावल, बोदवड, भडगाव , चाळीसगाव येथे उत्कृष्ट अधिकारी – कर्मचाऱ्यांना सन्मान करण्यात आला. चोपडा येथे मतदार जनजागृती रॅली व मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारोळा येथे रक्तदान शिबिर व डिजिटल गाव नकाशा वितरणाचे आयोजन करण्यात आले होते.

अमळनेर येथे महसूल सप्ताहानिमित्त ई-हक्क प्रणाली बाबत मार्गदर्शन, प्रचार व प्रसिध्दी करिता नागरीक मदत कक्ष स्थापन करण्यात आला‌.
अमळनेर उपविभागीय अधिकारी महादेव खेळकर, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

महसुल दिनानिमीत्त महसुल अधिकारी- कर्मचारी यांचे १० वी व १२ वी उत्तीर्ण गुणवंत १३ पाल्यांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला‌.
इतर तालुक्यात ही नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या महसूल दिनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारो नागरिकांना महसूली सुविधांचा लाभ वितरित करण्यात आला‌.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button