यावल ;- तालुक्यातील लंगडा आंबा येथे बहिणीशी वादाच्या कारणावरून चालक व सासऱ्यांनी मिळून मेहुण्याला उलटे लटकवून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवे ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 21 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर दरम्यान घडली. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जळगाव तालुक्यातील आमोदा खुर्द येथे शेतमजुरी करणारा राजू भीमसेन बारेला वय 22 याचा पत्नीशी वाद असल्याने या कारणावरून लंगडा आंबा येथे राहणाऱ्या त्याचे शालक संजय उर्फ संजू रतड्या बारेला, सोन्या रतड्या बारेला आणि सासरा रतड्या बारेला या तिघांनी राजू बारेला याला पकडून त्यांच्या लंगडा आंबा गावी उलटा लटकवूनलाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केल्याचा प्रकार 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते 22 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजे दरम्यान घडला. याप्रकरणी जखमीचा भाऊ रवींद्र वारेला याने फिर्याद दिल्यावरून ५ रोजी यावल पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.