खान्देशगुन्हेजळगांव

एटीएममध्ये कॅश भरताना तब्बल 65 लाखांचा अपहार ; चौघे जेरबंद

चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी एटीएममध्ये कॅश भरताना तब्बल 65 लाखांचा अपहार करणार्‍या कस्टोडियन, ऑडीटरसह चौघांना अटक करण्यात आली आहेत. प्रवीण देविदास गुरव (38, पाटणादेवी रोड, आदित्यनगर चाळीसगाव), दीपक भिकन पवार (34, पाटणदेवी रोड, आदित्यनगर चाळीसगाव), चंद्रशेखर एकनाथ गुरव (43, गुजराल पेट्रोलपंपाजवळ, निवृत्ती नगर, जळगाव) व राजेंद्र वाल्मीक चौधरी (58, नारायणवाडी, चाळीसगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

गोरक्षनाथ पोपट डोंगरे (38, शिवशंकर सोसायटी, रुम नं. 16 पाथरवट लेन, परेन आईसक्रिमच्या मागे, पंचवटी नाशिक) यांनी चाळीसगाव शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार प्रवीण देविदास गुरव, दीपक भिकन पवार (दोन्ही रा. पाटणादेवी रोड, आदित्यनगर चाळीसगाव) व ऑडीटर चंद्रशेखर एकनाथ गुरव (गुजराल पेट्रोलपंप जवळ, निवृत्तीनगर, जळगाव) यांनी संगनमताने चाळीसगाव शहरातील आयसीआयसीआय बँकेचे एक एटीएम व आयडीएफसी बँकेचे एक एटीएम असे दोन तसेच पाचोरा शहरामध्ये मनिस्पॉट एक एटीएम व आयसीआयसीआय बँकेचे एक एटीएम अशा एकूण चार एटीएम मशीनमध्ये कंपनीमार्फत बँकेने कंपनीचे नोकर असल्याने विश्वासाने रोख रक्कम टाकताना त्यात दरवेळी पूर्ण रक्कम न भरता त्यातून वेळोवेळी थोडी थोडी अशी एकूण 64 लाख 82 हजार 200 रुपये बाजूला काढून विश्वासघात केला.

माहे मे 2023 ते डिसेंबर 2023 दरम्यान हा प्रकार घडला. ऑडीटर चंद्रशेखर एकनाथ गुरव यांची दोघांवर नियंत्रण ठेवण्याची जवाबदारी होती मात्र सिक्युर हॅल्यु इंडीया लिमीटेड या खाजगी कंपनीच्या कर्मचार्‍यांना सहकार्य केले. दरम्यान, या गुन्ह्यात चाळीसगावातील राजेंद्र वाल्मीक चौधरी (58, नारायणवाडी, चाळीसगाव) या संशयिताने अपहारातील 14 लाखांची रोकड स्वीकारल्याने त्यासही अटक करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button