
जे.के. पार्क परिसरात गांजाच्या नशेखोरीवर MIDC पोलिसांची कारवाई; दोन जणांवर गुन्हा दाखल
जळगाव : शहरातील जे.के. पार्क परिसरात गांजाचा नशा करत असलेल्या दोन इसमांवर MIDC पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी (१५ मे) दुपारी कारवाई करत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी नशा करण्याचे साहित्य व गांजा जप्त केला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जे.के. पार्क परिसरात काहीजण गांजाचे सेवन करत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दुपारी ४ वाजता कारवाई करत आसीफ खान आलीयान खान (वय ४२) आणि शेख मेहेमुद शेख महेबुब (वय ५३, दोघेही रा. तांबापूरा, जळगाव) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या जवळून गांजा व नशेचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामदास कुंभार करीत आहेत.