जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा कार्यपध्दतीची माहिती व्हावी यासाठी विविध विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींना विद्यापीठात बोलावून ही प्रक्रिया अवगत करून देण्यात आली.
विद्यापीठाने सर्व कामकाजात अधिक पारदर्शकता असावी या दृष्टीने विविध पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठाच्या परीक्षांची निकाल प्रक्रिया कशी असते, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, तपासणी व अनुषंगिक कार्यपध्दतीची प्रक्रिया अवगत व्हावी यासाठी विद्यापीठाने प्रातिनिधीक स्वरूपात विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींना विद्यापीठात पाचारण केले व त्यांना ही सर्व प्रक्रिया समजावून सांगितली. या प्रतिनिधींच्या
शंकाचे देखील निरसन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांनी केले. यावेळी अजय सपकाळ, कुणाल पाटील, विरेंन्द्र तुरकाडे, वेद बारी, कल्पेश पवार, चेतन पवार आदी प्रतिनिधी उपस्थित होते. विद्यापीठाने या पध्दतीचा उपक्रम राबवून अनोखे पाऊल उचलले आहे.