जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळेत शिक्षणशास्त्र, विद्यार्थी विकास विभाग आणि क्षमता निर्माण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणशास्त्र विभागात दि. ३ जानेवारी ते दि. ९ जानेवारी या कालावधीत राबविण्यात येणा-या “आत्मनिर्भर युवती अभियान” या कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्याती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले. विद्यार्थिनींना अभ्यासेत्तर उपक्रमात सहभागी होण्यास प्रवृत्त करण्यासाठी आणि त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास व त्यांच्यात विविध अंगाने आत्मनिर्भरता निर्माण करण्याकरीता व त्यांच्यामधील विविध कला गुण विकसित करण्यासाठी विद्यापीठाने आत्मनिर्भर युवती अभियान ही योजना सुरू केली आहे.
पहिल्या सत्रात जळगाव जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक श्री. अनिल गाढे व ललीत तावडे यांनी “रोजगार निर्मिती/ नवीन उद्योग उभारणीसाठीच्या शासकीय योजना” या विषयावर मार्गदर्शन केले. दुस-या सत्रात व्यवस्थापन प्रशाळेच्या संचालिका प्रा. मधुलिका सोनवणे यांनी “महिला उद्योजक आणि ई-विक्री” या विषयावर विद्यार्थिंनींना मार्गदर्शन केले. या महिला उद्योजक तयार होत असतांना कोणकोणत्या आव्हांनाचा सामना करावा लागतो. व त्यातुन कसा मार्ग काढून यशस्वी उद्योजिका होता येते हे उदाहरणासह स्पष्ट करून सांगितले. या कार्यशाळेत एकुण ४० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. यावेळी प्रशाळेच्या विभागप्रमुख डॉ. मनीषा इंदाणी, डॉ. संतोष खिराडे, डॉ. स्वाती तायडे, कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ. रणजित पारधे यांनी तर सह-समन्वयक म्हणून प्रणाली सोनवणे यांनी काम केले.