जळगाव ;- पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मानासिक आरोग्यासाठी ४ रोजी मानसिक आरोग्य शिबीर जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. मानसिक आरोग्य याविषयी तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, अपर अधीक्षक आदी उपस्थित होते.
हल्लीच्या काळात पोलिसांवर आलेल्या तणावातून व नेहमीच्या तणावातून त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्य खराब होत असते त्यातून मुक्ती होण्याकरिता निरोगी आरोग्य कसे निर्माण करण्याकरिता उपचार, मानसिक आरोग्य कायदा २०१७ बाबत सविस्तर मार्गदर्शन मानसोपचार तज्ञ डॉ. मयूर मुठे, मानसोपचार तज्ञ डॉ. कांचन नारखेडे यांनी माहिती दिली तसेच मानसोपचार तज्ञ दौलत लिमये मानिसिक आजार व उपचार बाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळाप्रसंगी राखीव पोलीस निरीक्षक, संतोष सोनवणे, पोलीस वेलफेअर शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रेश्मा अवतारे, सर्व पोलीस अधिकारी अंमलदार, मनो सामाजिक कार्यकर्ता ज्योती पाटील, मनोविकृती परिचालक विनोद गडकर कम्युनिटी परीचारीका राखी भगत, कार्यक्रम सहाय्यक मिलिंद ब-हाटे, चंद्रकांत ठाकूर, असे उपस्थित होते, तसेच कार्यक्रम संपन्नतेसाठी सर्व पोलीस अधिकारी अंमलदार व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम पथक सामान्य रुग्णालय जळगाव यांनी परिश्रम घेतले.