खान्देश टाइम्स न्यूज l २७ एप्रिल २०२४ l जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार करण बाळासाहेब पाटील (पवार) हे आज धरणगाव तालुक्यातील पिंप्री, मोठी वाघळुद, पिंपळेसीम,सतखेडा, अंजनविहिरे,चावलखेडा, खामखेडा, वाकटुकी, दहिदुला, निंभोरा, बाभुळगाव, चमगाव, आहिरे.बु,सोनवद या गावांना प्रचारावेळी भेटी दिल्या.
या प्रचार दौऱ्यावेळी परिसरातील ज्येष्ठ शेतकरी, कष्टकरी, युवक, माता भगिनी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी/कार्यकर्ते सर्वांनी मिळून जळगाव लोकसभा मतदारसंघात मशाल पेटवण्याचा निर्धार करून करण दादा पाटील यांना प्रचंड मताधिक्यांनी विजय मिळवून देण्याचा निर्धार केला.
यावेळी करण दादा पाटील यांनी गावांना भेटी देतेवेळी जळगाव जिल्ह्यातील कापूस,केळी,उडीद, मूग, सोयाबीन या मुख्य पिकांचे उत्पादक शेतकऱ्यांची चर्चा करून शेती,माती व शेतकऱ्यांशी एकनिष्ठ राहून शेतकऱ्यांचे काम सोडवण्यासाठी कटिबद्ध राहो असे उपस्थित शेतकऱ्यांना आश्वासित केले. यावेळी गुलाबरावजी वाघ, निलेश चौधरी ,प्रा.व्हि डी.पाटील सर, रवींद्र बिला पाटील, धनराज माळी ,दिलीप अण्णा पाटील, मनोज पाटील ,जयदीप पाटील, दीप पाटील, बाळासाहेब पाटील,विजय सूर्यवंशी, ज्ञानेश्वर पाटील, सुरेश पाटील ,सचिनधनगर,नितीन पाटील,भूषण पाटील, संभाजी पाटील ,सौरभ पाटील ,विलास ननावरे, अरविंद देवरे ,सुनील सोनवणे, नितीन वाघरे ,चंद्रकांत बागुल, राजू वाणी ,भुजबल पाटील ,राजू पवार ,नितीन संतोष सोनवणे, दिगंबर बापू बडगुजर, समाधान दगडू पाटील, दीपक चौधरी,योगेश कोळी,जिजाऊराव हरी पाटील, शालिक हरचंद पाटील, गुलाबराव पाटील, बाळकृष्ण पाटील, दत्तू पाटील,निंबा पाटील, शांताराम पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र पाटील, व ग्रामस्थ उपस्थित होते.