चाळीसगाव- एमआयडीसी परिसरातील ट्रान्सफॉर्मर मधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४ लाखांची तांब्याची तार व प्लेटा चोरी प्रकरणातील दोन जणांना चाळीसगाव पोलिसांनी अटक केली असून त्याच्या कडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सचिन केशवराव नागरे रा. हिरापुर रोड, यांच्या भागिदारी कंपनीत असलेली मॉर्निसा बायो ऑर्गनिक प्रायव्हेट लिमेटेड, चाळीसगांव मधुन कोणतरी अज्ञात इसमांनी ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याची तार व प्लेटा तसेच आरमाड केबल असा एकुण ४,१०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याबाबत त्यांनी तक्रार दिली दिली होती . त्यानुसार पोलिसांकडून तपास करण्यात येत होता .
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अहमद शेख ईस्माईल (वय-२७) व सलमान बेग हुसेन बेग (वय-२६) दोन्ही रा. जहागिरदारवाडी, चाळीसगांव यांनी हि चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोना दिपक पाटील, सफौ शशिकांत महाजन, पोहेकॉ योगेश बेलदार, नितीन वाल्हे, पोकॉ भरत गोराळकर, अमोल पाटील, नंदकिशोर महाजन, अजय पाटील, अमोल भोसले या पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजार केले असता पोलीस कोठडी मिळाल्याने आरोपींनी चोरीस गेलेल्या मालापैकी १,०४,६९० रुपये किमतीच्या १४५ फुट आरमाड केबल जप्त करण्यात आलेली असून उर्वरीत मुद्देमाल जप्त करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
हि कारवाई पोलीस अधिक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख व पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.