
अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले
उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या पथकाची कारवाई
जळगाव प्रतिनिधी :-शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असून उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या पथकाने वाळू वाहतुकीसाठी जाणाऱ्या डंपर पकडून कारवाई केली आहे. रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अवैधरित्या जाणारे डंपर क्रमांक एम एच 04 ईबी 8873 जात असताना पकडले असून चालक अनिल नन्नवरे याला ताब्यात घेण्यात आली असून त्याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या कार्यालयातील पीएसआय समाधान गायकवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास महाजन, सुहास पाटील, रवींद्र मोतीराया, सचिन साळुंखे, महेश पवार, गोपाल पाटील, चंद्रकांत पाटील आदींच्या पथकाने केली.