जळगावः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत संपुर्णभारत देश क्षयमुक्त करण्याचा संकल्प केलेला आहे. याचाच एक भाग म्हणून या वर्षी ही दि.२३ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधी सक्रीय क्षयरोग मोहीम राबविण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यात एकुन ४१ लाख ३० हजार ७ लोकसंख्येतून १० टक्के म्हणजे ४ लाख १३ हजार १ प्रमाणे स्थलांतरीत तसेच खाणीमध्ये काम करणारे कामगार, बेघर, ईतर सामाजिक गट तसेच तुरूंग, वृध्दाश्रम, आश्रमशाळा, आदीवासी मुलांचे वस्तीगृह, मनोरूग्णालय इत्यादी ठिकाणी सक्रीय क्षयरूग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.
या शोध मोहिमेकरीता २०७ टिम त्यांच्यात ४१४ मेंबर आणि ४१ सुपरवायझर यांच्या देखरेखीखाली व जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा आरोग्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे. ही मोहिम यशस्वी करण्याकरीता नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन जि.पचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी केले आहे.