जळगाव ;- शहरातील कांचन नगर येथील ६४ वर्षीय व्यक्ती आणि पाचोरा तालुक्यातील एका ४५ वर्षीय वक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, कांचन नगर भागात राहणारे ६४ वर्षीय आत्माराम विश्वास ढुंढाले यांना हृद्य विकाराचा झटका आल्याने त्यांना उपचारांसाठी १० रोजी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता सीएम डॉ. निरंजन देशमुख यांनी दिलेल्या खबरीवरून शनिपेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची मनोंद करण्यात आली आहे . तसेच पाचोराला शहरातील वाल्मिक पुंडलिक पाटील वय ४५ यांना हृदास्यविकाराचा झटका आल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱयांनी मयत घोषित केले . याबाबत पिंपळगाव हरेश्व्र पोलिसांत अक्षमात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.