खान्देशगुन्हेजळगांवशासकीय

वाळू माफियांचा एरंडोल प्रांताधिकाऱ्याना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

एरंडोल ;- वाळू माफियांची मुजोरी वाढली असून कारवाईसाठी गेलेल्या एरंडोल प्रांताधिकाऱ्याना खाली पाडून त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना धक्कदायक प्रकार घडला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल तालुक्यातील उत्राण शिवारातील गिरणा नदीच्या पात्रात प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड हे आपल्या सहकार्‍यांसह कारवाई करण्यासाठी गेले होते. ख्वाजा मिया दर्ग्याजवळ ते गेले असता तेथे दहा-बारा ट्रॅक्टर्स आढळून आले. पथकाला पाहताच यातील बरेचसे वाहने घेऊन पळून गेले. मात्र दोन ट्रॅक्टर्स तेथेच असल्याने महसूल पथक कारवाई करण्यासाठी वाहनातून खाली उतरले. याप्रसंगी, चार-पाच जणांनी आवाज देऊन इतरांना बोलावले. या सर्वांनी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांना खाली पाडून त्यांना गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. सहकार्‍यांनी प्रतिकार केल्याने अनर्थ टळला. तर, या गुंडांनी महसूल पथकावर जोरदार दगडफेक केली. यात प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्यासह सहकारी जखमी झाले आहेत.

या प्रकरणी उत्राणचे मंडळ अधिकारी प्रमोद मेघश्याम गायधनी यांनी कासोदा पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार, आकाश राजेंद्र पाटील, अमोल ( पूर्ण नाव माहित नाही ); राहूल ( पूर्ण नाव माहित नाही ); दादाभाऊ ( पूर्ण नाव माहित नाही ) आणि सागर ( पूर्ण नाव माहित नाही ) या सर्वांच्या विरोधात भाग ५, गुरनं ०१/२०२४ भादंवि कलम-३०७, ३५३, ३३२, ३२३, ३७९, १४३, ५०४, ५०६ आणि महाराष्ट्र जमीन महसूल आ. नियम ४८ (७) (८) खाण आणि खनिज अधिनियम २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अमोल गुंजाळ हे करीत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button