जळगाव : मोबाईल वर खेळत असलेल्या चिमुकलीला अभ्यास कर असे सांगून रागवले असता आईचा राग मनात ठेऊन पद्मश्री उर्फ परी भरत पाटील या १२ वर्षाच्या चिमुकलीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी १४ रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास रामानंद नगरातील नंदनवन कॉलनीत घडली, या घटनेमुळे चिमुकलीच्या कुटुंबियांना मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील रामानंद नगरातील नंदनवन कॉलनीत भरत पाटील हे वास्तव्यास असून ते शिक्षक आहेत. याठिकाणी ते कुटुंबियांसह वास्तव्यास असून त्यांना १२ वर्षाची पद्मश्री उर्फ परी नावाची मुलगी आहे. पद्मश्री ही अभ्यासाच्या वेळेस मोबाईल खेळत असल्याने तिच्या आईने तिला रागवले आणि तिच्याजवळील मोबाईल हिसकावून घेतला,
यावेळी रागाच्या भरात पद्मश्री ही घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत निघून गेली. याठिकाणी चिमुकलीने झोक्याच्या कडीला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले . बराच वेळ झाल्यावर देखील परी खाली न आल्याने कुटुंबिय खोलीकडे गेले, परंतु दरवाजा ठोठावून देखील तिने प्रतिसाद न दिल्याने कुटुंबीयांनी यावेळी दरवाजा तोडला असता चिमुकली गळफास घेतलेल्या अवस्थेत बघताच तिच्या कुटुंबियांनामोठा आघात बसला . त्यांनी एकच आक्रोश आक्रोश केला, कुटुंबियांनी लागलीच चिमुकलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. सचिन पाटील यांनी चिमुकलीची तपासणी करीत तिला मयत घोषीत केले. यावेळी पाटील कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि विठ्ठल पाटील व ज्ञानेश्वर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मत्यची नोंद करण्यात आली आहे.