खान्देशगुन्हेजळगांव

कुसुंबा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत सुरक्षारक्षक ठार

जळगाव ;- कामावरून दुचाकीने घरी जाणार्या दुचाकीस्वाराचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावानजीक सोमवारी १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करतार तोताराम पवार वय ४८ रा. मांडवे दिगर ता.भुसावळ ह.मु. कुसुंबा ता.जि.जळगाव असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, करतार पवार हे आपल्या पत्नी आणि तीन मुलांसह जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे राहहत होते . एमआयडीसीतील मकरा एजन्सी येथे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला होते. सोमवार १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता कामावरून घरी जाण्यासाठी दुचाकीने येत असताना कुसुंबा गावाच्या काही अंअंतरावर दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने करतार पवार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक आणि पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी निर्मलाबाई, दोन मुले संभाजी, ईश्वर आणि मुलगी भारती असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button