जळगाव : रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने धडक दिल्याने रामचंद्र पाटील (वय ५८, रा. रामेश्वर कॉलनी) हे ठार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी धडक देणाऱ्या कारचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेश्वर कॉलनीतील रहिवासी रामचंद्र पाटील रस्ता ओलांडत होते. त्या वेळी जळगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कारने (एमएच १९, एपी ५०५५) त्यांना जोरदार धडक दिली. त्यात पाटील हे ठार झाले. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी मयताच्या पत्नी सरला पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील करत आहेत.