पारोळा;- घराच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी घरातील दीड लाख रुपये किमतीचे दागिने आणि २० हजारांची रोकड लांबविल्याचा प्रकार तालुक्यातील सुमठाणे येथे उघडकीस आला असून याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली महिती अशी कि, सुमठाणे येथील शेतकरी असलेले नामदेव उत्तम पाटील वय ५८ यांच्या घरातील दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी दीड लाखांचे सोन्या चांदीचे दागिने आणि वीस हजार रोख लांबविल्याची घटना ४ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उप निरीक्षक राजू जाधव करीत आहे.