जळगाव :- लाच स्वीकारल्या प्रकरणी आरटीओ अधिकारी दीपक पाटील यांच्यावर एसीबीच्या विभागाने कारवाई केली होती. या कारवाईची दखल घेऊन मुंबई येथील परिवहन आयुक्तालयात राज्य परिवहन आयुक्तांनी त्यांची अकार्यकारी पदावर उचल बांगडी केली आहे.त्यांच्या पदाचा अतिरीक्त पदभार धुळे आरटीओ अशोक पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी नवापूर येथील सीमा तपासणी नाक्यावर नियुक्ती दिल्याच्या मोबदल्यात अधिकाऱ्याकडे तीन लाखांच्या लाचेची मागणी केली होती तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली होती.
या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरटीओ दीपक पाटील यांचा खाजगी पंटरला तीन लाखांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले होते. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान
आरटीओ दीपक पाटील यांच्यावर झालेल्या कारवाई या अहवाल हा परिवहन आयुक्तांकडे सादर करण्यात आल्याने
राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी . दीपक पाटील यांची तात्पुरत्या स्वरुपात पुढील आदेश होईपर्यंत त्यांची मुंबई येथील परिवहन आयुक्तालयात अकार्यकारी पदावर बदली केल्याचे आदेश काढलेत.
आरटीओ दीपक पाटील यांची उचलबांगडी केल्यानंतर त्यांचा पदाना पदभार हा धुळे के रोधील प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार याच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. तसेच दीपक पाटील यांना साकाळ पदावरुन कार्यमुक्त करणे असे देखील आदेशात नमूद करुयात आले आहे