यावल ;- तालुक्यातील शिरागड येथे यावल वनक्षेत्रपाल पश्चिम वनपाल वागझिरा यांच्या गस्ती पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून 18 जानेवारी 2024 रोजी तुरखेडा रस्त्याला ट्रॅक्टर क्र. MH19CZ2394 विना परवाना जळवू लाकडे वाहतूक करीत असताना मिळून आले. यावेळी जप्त मुद्देमाल पंचरस जळाऊ 5.000 घ.मी. माल किंमत 5124. ट्रॅक्टर किंमत 3,00000/ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्ह्याबाबत वनरक्षक निंबादेवी यांनी वन गुन्हा नोंदवीला.
हि कारवाई यावल उपवनसंरक्षक जमीर शेख .,प्साहायक वनसंरक्षक रथमेश हाडपे , यांच्या मार्गदर्शनाखाली ,वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे वनपाल वाघझिरा विपुल.दि.पाटील , अतिरिक्त कार्यभार वनपाल हरीपुरा ,वनरक्षक चेतन शेलार ,अक्षय रोकडे, राकेश निकुंभे, वाहन चालक शरद पाटील यांनी केली.