
खेळ छंद म्हणून जोपासा – भरतदादा अमळकर
जैन स्पोर्टस ॲकडेमीच्या समर कॅम्प -२०२५ चा समारोप ; विजेत्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
जळगाव प्रतिनिधी – ‘आपण खेळ खेळतो मात्र त्यात बक्षिस मिळेलच असे नाही परंतू आनंद नक्कीच मिळेल, खेळभावना विकसीत होईल, आपल्या ध्येयाकडे करिअर म्हणून बघण्याचा संस्कार आपल्यावर संस्कारित होईल; त्यासाठी खेळ हा छंद म्हणून जोपासला जावा. आवडीने खेळले तर त्यात करिअर करता येते. असे मनात पक्के ठरवले पाहिजे तसे झाले तर मार्गही सापडतो, खेळाव्यतिरिक्त काय आवडते याचाही विचार आपण केला पाहिजे, असा सल्ला देत देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभा देवसिंग पाटील यांची बॅडमिंटनपटू ते राष्ट्रपती असा प्रेरणादायी प्रवास खेळाडूंसमोर केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर यांनी उलगडून दाखविला.
जैन स्पोर्टस ॲकडमीचा समर कॅम्प – २०२५ चा समारोपाच्या पारितोषिक वितरण समारंभावेळी प्रमुख अतिथी म्हणून भरतदादा अमळकर बोलत होते. कांताई सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपिठावर जैन इरिगेशनचे मिडीया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, जिल्हा बुध्दिबळ असोसिएशनचे सचिव नंदलाल गादिया, जैन स्पोर्टस ॲकडमीचे प्रशासकीय अधिकारी अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, गिरीश कुळकर्णी उपस्थित होते.
जैन इरिगेशन सिस्टम्स लि., भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, अनुभूती स्कूल, कांताई नेत्रालय यांच्या सहकार्याने दि. १५ एप्रिल ते ११ मे पर्यंत समर कॅम्प चे आयोजन केले होते. क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुध्दिबळ, बास्केटबाल, तायक्वांडो, फुटबाॅल, कॅरम या क्रीडाप्रकारामध्ये ५८० खेळाडूंनी सहभाग घेतला. अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल सेंकडरी, कांताई सभागृह याठिकाणी समर कॅम्प चे आयोजन केले होते.
जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे नंदलाल गादिया यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करून उन्हाळी प्रशिक्षण शिबीरात सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. माती ओली असेल तर तिला आकार देता येतो त्याप्रमाणे उन्हाळी प्रशिक्षण शिबीरात खेळाडूंना घडविले जाते. जैन स्पोर्टस अकॅडमीतर्फे गेल्या २३ वर्षापासून हे सातत्याने सुरू आहे. शिस्त, वेळेचे महत्त्व, शारिरीक व मानसिक दृष्ट्या कणखर होऊन सर्वांगिण व्यक्तिमत्त्व घडविण्याचे काम समर कॅम्प मधून होत असल्याचे ते म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे मोबाईल व टिव्ही वरील स्क्रिन टाईम मुलांचा खूप वाढला आहे. त्यातून मुलांना काहिअंशी बाहेर काढता आले याचेही समाधान आहे.
सुयश बुरूकुल यांनी समर कॅम्प विषयी आढावा घेतला. गिरीश कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. वरूण देशपांडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
*समर कॅम्प मधील यशस्वी खेळाडू*
उन्हाळी प्रशिक्षण शिबीरात बॅडमिंटनमध्ये उत्कृष्ट खेळाडू भव्य रूणवाल, काव्या पाटील, अदव्य जोशी, स्मित सरोदे, मुकुंदा चौधरी, दुर्वा शिंपी, ऋग्वेदा सराफ, टेबल टेनिस मध्ये दरशील सोनवणे, बॉस्कटेबॉलमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून मुलींच्या मोठ्या गटातून अंकिता बिडकर, (लहान गट) डिम्पल कराळ, मुलांच्या गटात देवशेखर सोनार, विनित म्हसकर तर बुद्धिबळमध्ये कुशन चौधरी, गौरव बारी, मोनीश वागदे, काव्या चौधरी, प्रेरणा पाटील, विराट बोरसे, वंश सोनवणे, हर्षदा पाटील, फुटबॉलमध्ये उत्कृष्ट ट्रेनी द्रुवांकर पाटील, उत्कृष्ट खेळाडू विजय ठाकरे, आकांक्ष दिवारी, दीप सोनवणे, नाहुश वर्मा, तायक्वांडो मध्ये आराध्या पाटील, पुर्वेश विदाते, कोमल गाढे, मयूर पाटील, गुरु करांडे, कॅरममध्ये उत्कृष्ट ट्रेनी आरूषी सोलासे, उत्कृष्ट खेळाडू धिरज घुगे, अल्फेज पिंजारी, रिहान तलरेजा, साहिल सोनवणे, अप्रतिम घारगे, उदयोमुख खेळाडू म्हणून निधी शिरखे, तर क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फलंदाज (मोठा गट) श्रेयश पोलभुने तर (लहान गट) रुद्रा लाडवंजारी यांना चषक, बॅट, ग्लोज ने सन्मानीत केले. उत्कृष्ट गोलंदाज (मोठा गट) स्पर्श बियाणी, (लहान गट) केशव मालु त्यांना शूज, बॉल व चषक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हर्षल काळे, उत्कृष्ट विकेट किपर (मोठा गट) किरण निकम, (लहान गट) क्रिष्णा काबरा यांना चषकासह विकेट किपर ग्लोज, पॅड व क्रीडा साहित्याने गौरविले. तर समर कॅम्प मधील बेस्ट ट्रेनी ठरलेला यश पवार याचा चषकासह, बॅट, पॅड, ग्लोज, हेल्मटसह संपूर्ण किट देण्यात आले. मुलींच्या गटात उत्कृष्ट खेळाडू दिव्या शिंदे ठरली तिलासुद्धा सन्मानीत करण्यात आले. समर कॅम्प मध्ये जैन स्पोटर्स अकॅडमीमधील सर्व प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.
*फोटो ओळ* – जैन स्पोर्टस अॅकडमीच्या समर कॅम्प मधील यशस्वी खेळाडूंसमवेत भरतदादा अमळकर, अनिल जोशी, नंदलाल गादिया, अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, गिरीष कुळकर्णी आदी मान्यवर