रावेर / यावल;- -विधानसभा मतदारसंघातील रावेर यावल तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना आरोग्य सुविधा सुलभ व्हावी यासाठी प्रहार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने जनसेवा पॅथॉलॉजी लॅब चे लोकार्पण करण्यात आले आहे. यामध्ये रक्त, लघवी तसेच अन्य चाचण्या ६५% सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे.
फैजपूर शहर येथे डॉ.खाचने साहेब व नगरसेवक जफर मेंबर, सावदा शहर येथे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, माजी नगरसेवक फिरोज खान, सामाजिक कार्यकर्ते आत्माराम तायडे सर, रावेर शहर येथे डॉ.शब्बीर शेख, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र महाजन, माजी नगरसेवक सादिक शेख, सामाजिक कार्यकर्ते अमोल महाजन, माजी नगरसेवक असदऊल्लाह खान यांच्या शुभहस्ते उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
यावेळी रावेर-यावल मतदारसंघाच्या सेवेत अनिल चौधरी जनसेवा पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातून अद्यावत तंत्रज्ञान असलेली ही पॅथॉलॉजी लॅब निश्चितपणाने सर्वसामान्य रुग्णाला वरदान ठरेल. त्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णाला माफक दरात सेवा देण्याचे काम या पॅथॉलॉजी लाभच्या माध्यमातून होत राहील, असा विश्वास माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी बोलताना व्यक्त केला.
रावेर यावल विधानसभा मतदारसंघातील सावदा, फैजपूर, रावेर या भागात प्रजासत्ताक दिनानिमित्त 65% सवलतीच्या दरात लॅबचे लोकार्पण करण्यात आले आहे. सेवेतून सत्तेकडे कडे जाण्याचा अभिवचनातून गोरगरीब नागरिकांना या सभेचा लाभ व्हावा म्हणून वैद्यकीय क्षेत्रातला पॅथॉलॉजी लॅबचा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या वेळी माजी नगरसेवक अमोल निंबाळे, वसीम जनाब, डॉ.दानिश सर, माजी नगरसेवक राजू साबळे, आरिफ खान, यावल तालुकाध्यक्ष नंदकिशोर सोनवणे, सावदा शिवसेना शहराध्यक्ष सुरज परदेशी, गणेश बोरसे, राकेश भंगाळे, मोहसीन शेख, विनोद कापले, पिंटू धांडे, विलास पांडे, सचिन महाजन, सरपंच योगेश कोळी, माजी सरपंच खेमचंद कोळी, सचिन कोळी, विक्की काकडे, वसीम शेख, माजी सरपंच ज्ञानेश्वर तायडे, उठखेडा उपसरपंच रौनक तडवी, सचिन झाल्ते, बंटी मंडवाले इ. वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.