खान्देशगुन्हेजळगांवशासकीयसामाजिक

महावितरणच्या ट्रान्सफार्मरमधून ५०० लिटर ऑईलची चोरी

जळगाव ;- एमआयडीसीतील डी सेक्टरमधील घटना: एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखलजळगाव महावितरण कंपनीच्या ३१५ केव्हीएच्या ट्रान्सफार्मरमधून ५०० लिटर आईल चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्‌याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

महावितरण कंपनीच्या मालकीचे ट्रान्सफार्मर असून दि. ४ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा ते पाच जानेवारी सकाळी १० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी ट्रान्सफार्मरमधून १२ हजार ५०० रुपये किमतीचे ५०० लिटर ऑईल चोरून नेले, हा प्रकार लक्षात आल्यानंतर महावितरणचे कर्मचारी हर्षल नेहते यांनी मंगळवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक किशोर पाटील करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button