खान्देशजळगांव

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परिश्रमांनी “व्हायरल न्यूमोनिया” तून मी कसा वाचलो ?

मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाने दिले जीवदान ; पत्रकार भगवान सोनार यांचे दाहक अनुभव

जळगाव – पत्रकार भगवान सोनार नुकतेच जीवघेण्या “व्हायरल न्यूमोनिया” आजारातून बरे होऊन जळगावात येत आहेत. मुंबईच्या सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परिश्रमाने त्यांना जीवदान मिळाले आहे. दि. २१ डिसेंबर २०२३ रोजी खोकला व तापाने फणफणुन जबर आजारी पडले. यावेळी ते जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होतो. डॉक्टरांनी छातीचा एक्सरे काढण्यासाठी पाठविले. एक्सरे काढून आल्यानंतर बघतो तर काय छातीमध्ये संपूर्ण कफ पसरलेला होता आणि श्वास घ्यायला अडचण होत होती. यावेळी डॉक्टरांनी ऑक्सिजन बघितला तर ८५ ते ९० दरम्यान होता. यावेळी डॉक्टरांनी (HRCT) म्हणजे छातीचा सीटी स्कॅन काढण्याचा सल्ला दिला. लागलीच ऑक्सिजन लावून जळगाव शहरातील ॲडव्हान्स सिटीस्कॅन सेंटर येथे सिटीस्कॅन काढून शहरातील दुसऱ्या एका खाजगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात २३ डिसेंबर रोजी दाखल केले. यावेळी ऑक्सिजन लावून उपचार सुरू होता.

दि. २२ रोजी सर्व चाचण्या करण्यात आल्या, या चाचण्यांतून व्हायरल न्युमोनिया हा आजार असल्याचे निष्पन्न झाले. पण कोरोनासह काही रक्ताच्या चाचण्या या निगेटिव्ह आल्या. पण व्हायरल न्यूमोनिया मोठ्या प्रमाणात छातीत पसरल्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागत होता. मला श्वास घेण्यास त्रास होत होता. यावेळी अतिदक्षता विभागातून डॉक्टरांनी मुंबई येथे हलविण्याचा सल्ला दिला. यावेळी परिवाराची चागलीच तारांबळ उडाली आणि २२ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता जळगाव येथून कार्डियाक आयसीयु ॲम्बुलन्सने पत्नी, सासु, भाऊ आणि दोन मित्रांसह मुंबईकडे उपचारासाठी निघालो.

रुग्णालयात अनेक नातेवाईक होते. पण एकही नातेवाईक ॲम्बुलन्समध्ये बसण्याची तयारी दाखवत नव्हते. यावेळी कळले, सुखात सर्व असतात. दुःखात कोणी नाही. मुंबईकडे जात असताना ॲम्बुलन्स मध्ये श्वास घेण्यासाठी खूप त्रास होत होता. पण भगवान सोनार हे हिंमत नाही हरले आणि सकाळी ८ वाजता जे.जे. रुग्णालय, मुंबई येथे पोहोचले. तिथं अर्धातास डॉक्टरांशी चर्चा करुन जळगाव येथील खाजगी दवाखान्यातील रिपोर्ट दाखवले. पण तिथे व्हेंटिलेटरचा बेड खाली नसल्यामुळे त्यांनी सेंट जॉर्ज हॉस्पिटल, सीएसटी येथे जाण्याचा सल्ला दिला. २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता यावेळी ॲम्बुलन्स सेंट जॉर्ज रुग्णालयात आली आणि तिथे आयसीयु वार्ड क्रमांक २ मधील डॉक्टरांनी उपचार सुरू केले. आणि तोंडाला श्वास नियंत्रणात राहण्यासाठी बायपास व्हेंटिलेटर लावले. सुरुवातीचे आठ दिवस प्रकृती अस्वस्थ होती.

रुग्ण वाचण्याची शक्यता दिसून येत नव्हती. पण सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील डॉक्टर्स व नर्सिंग स्टाफ यांनी भगवान सोनार यांना धीर दिला व हिंमत वाढवली. त्यांनी व्हील पावर मजबूत ठेवली आणि २ जानेवारी २०२४ पासून माझ्या उपचारात फरक पडू लागला विभागप्रमुख डॉ. विद्या नागर, सहयोगी प्रा. डॉ. मधुकर गायकवाड, सहायक प्राध्यापक डॉ. निलीमा वानखेडे (एम डी फिजिशीयन) यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली डॉ .चेतन यादव, डॉ. पवन कुटे, डॉ .आदित्य कुमार,डॉ.विक्रम जाधव, डॉ.काजल मुळीक, डॉ. आशुतोष पांडे आदी जनरल फिजिशीयन २४ तास लक्ष ठेऊन दररोज वेगवेगळ्या पध्दतीने औषधी देऊन उपचार केला जात होता. त्यामुळे प्रकृतीत सुधारणा होतांना दिसून येत होते. १६ जानेवारी रोजी बायपास व्हेंटिलेटर काढले आणि ऑक्सिजन नळीवर श्वास घेण्यास सुरुवात केली. धिरे धिरे ते पण ऑक्सिजन कमी होऊ लागले. २० जानेवारी रोजी भगवान सोनार आयसीयुमधून जनरल वार्डात शिफ्ट करण्यात आले. यावेळी मोकळा श्वास घेऊ लागले. पण २८ दिवस आयसीयुमध्ये असल्याने पाय पूर्ण बधिर पडलेले होते. चालणे जमत नव्हते. पण हिम्मत वाढवली आणि पायी चालण्यास सुरुवात केली. एक महिना ५ दिवस संपूर्ण उपचार घेतला. तेव्हा कुठे २७ जानेवारी रोजी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली.

मुंबईत आलो, म्हणूनच वाचलो…

मी जर मुंबई आलो नसतो तर खरच मी वाचलो नसतो हे मात्र खर आहे. मी माझे मरण जवळून बघितले. पण अशा परिस्थितीमध्ये काही मित्रांनी माझा अप प्रचार केला तर काहीना वाटले मी वाचणार नाही. ज्या नातेवाईक व लोकांच्या मी कामात पडलो होतो त्यांनी सुध्दा माझ्याकडे दुर्लक्ष केले होते. अशा परिस्थितीत मला उद्योगपती अशोकभाऊ जैन, लकी अण्णा टेलर, आ. राजुमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, रवींद्र शर्मा, आरोग्यदुत रामेश्वर नाईक यांनी वेळोवेळी खंबीर साथ दिली. यासह माझे काही शिरसोलीतील मोजके सहकारी आहेत, त्यांचेही अगणित आभारी आहे. मुंबईसारख्या शहरात माझं कुटुंब हे बाहेर राहून मिळेल तिथे जागेवर झोपत होते. पण मला सोडत नव्हते. अश्यावेळी कळले. सुखात सर्व असतात पण दुःखात कोणी नाही. हे मात्र शिकायला मिळाले
-भगवान सोनार, रुग्णाची प्रतिक्रिया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button