जळगाव;- देशी कट्टा बाळगणा-या संशयिताकडे पाच लाख रुपयांची मागणी करत ती पूर्ण न झाल्याने त्याच्या कानातील सोन्याची बाळी काढून घेणारे अमळनेर पोलिस ठाण्याचे हवालदार लक्ष्मण शिंगाणे यांना निलंबित करण्यात आले आहे. याच प्रकरणी महामार्ग पोलिस चौकीचे कर्मचारी रितेश चौधरी यांचाहि अहवाल संबंधितांना पाठवण्यात आला आहे.
दि. १० जानेवारी रोजी दुपारी अमळनेर पोलिस ठाण्याचे हवालदार लक्ष्मण शिंगाणे, पाळधी महामार्ग पोलिस चौकीचे कर्मचारी रितेश चौधरी हे हातेड, ता. चोपडा येथील दोन खासगी पंटरसह चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेले होते. तेथे शुभम प्रकाश सूर्यवंशी (रा. हातकणंगले, ता. कोल्हापूर) यास त्यांनी अडवले. त्याच्याकडे गावठी कट्टा मिळाल्यानंतर पाच लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र तो पैसे देऊ न शकल्याने त्याच्या कानातील सोन्याची बाळी त्यांनी हिसकावले होते.