जळगाव;- दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी रस्त्याने घरी जात असताना महिलेच्या गळ्यातील ७४ हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना शहरातील हनुमान कॉलनी परिसरात सोमवारी २९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, रुची लक्ष्मी काबरा (वय- ४५, रा. अभियंता कॉलनी) या महिला आपल्या परिवारासह राहत असून सोमवारी २९ जानेवारी रोजी ८ वाजता रूची काबरा या शहरातील हनुमान कॉलनी परिसरातून पायी जात असतांना त्या वेळी दुचाकीवरून दोन जण आले व त्यांच्या गळ्यातील २६ हजार रुपये किमतीची साडे चार ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ४७ हजार रुपये किमतीची आठ ग्रॅम वजनाची मणी, मंगळसूत्र असलेली पोत असा एकूण ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तोडून नेला. ही घटना घडल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली.मात्र दोन्ही अज्ञात भामटे सोन्याचे मंगळसुत्र घेवून फरार झाले होते. रामानंद नगर पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता दुचाकीवरील अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रोहिलास गभाले करत आहेत.