बोदवड ;- शहरातील जामठी दरवाजा येथे राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील लाकडी पेटीत ठेवलेले चार लाख रुपये रोख आणि १४ हजार रुपये किमतीचे चांदीच्या बाह्या अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार 25 रोजी सकाळी साडेदहा ते दीड वाजे दरम्यान घडला. याबाबत बोदवड पोलीस स्टेशन अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शेती व्यवसाय करणारे रामधन नामदेव चापोरकर हे जामठी दरवाजा परिसरात वास्तव्याला असून त्यांच्या बंद घरातून 25 जानेवारी रोजी सकाळी साडेदहा ते दीड वाजेच्या दरम्यान चार लाख रुपये रोख आणि 14 हजार रुपये किमतीच्या चांदीच्या बाह्या असा एकूण चार लाख 14 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत शेतकरी रामधन चापोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद श्रीनाथ करीत आहे.