जळगांवक्रीडा

जळगांव पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीला बहिणाबाई विशेष पुरस्काराने सन्मान

जळगाव l ०१ फेब्रवारी l २०१४ l जिल्हा पोलिस दल पोलिस वेल्फेअर फाउंडेशन द्वारा संचलित पोलीस स्पोर्ट्स अकॅडमी जळगाव नेहमीच कराटे व स्केटिंगच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंची प्रगती कशी साधता येईल यावर लक्ष देत असते. पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रशिक्षिका महिला पोलीस कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम व महिला पोलीस स्केटिंग प्रशिक्षण जागृती काळे यांच्या माध्यमातून शासकीय शालेय स्पर्धा जिल्हास्तर ते राज्यस्तरीय स्पर्धा व विविध संघटनांमार्फत मार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडू आपली उत्तम कामगिरी दाखवीत असतात आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या या कामाची दखल बहिणाबाई महोत्सव 2024 या कार्यक्रमात आयोजकांनी घेतली भरारी बहुउद्देशीय संस्था जळगाव यांनी कार्यक्रमात उपस्थित प्रमुख अतिथी खासदार उन्मेश पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते तसेच समाज कल्याण उपआयुक्त योगेश पाटील यांच्या हस्ते बहिणाबाई विशेष पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा गौरव केला. पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीला पुरस्कार मिळाल्याबद्दल दोघेही प्रशिक्षकांचे अभिनंदन व कौतुक पोलीस अधीक्षक जळगाव मा.एम. राज. कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहायक पोलिस अधीक्षक जळगाव भाग संदीप गावित ,पोलीस उपअधीक्षक गृह प्रमोद पवार , राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे ,वेल्फेअर पोलिस उपनिरीक्षक रेश्मा अवतारे ,रावसाहेब गायकवाड,संपूर्ण वेल्फेअर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button