खान्देशगुन्हेजळगांवशासकीय

मावळत्या अधीक्षकांना निरोप तर नूतन अधीक्षक रेड्डी यांनी स्वीकारला पदभार

जळगाव :- जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मला एक दिलाने साथ दिल्यामुळे आणि कर्तव्यासाठी त्यांनी दिलेली समर्पणाची भावना हेच माझ्या जळगाव पोलीस दलाच्या यशाचे गमक असल्याचे प्रतिपादन मावळते पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी काल येथे केले.

मावळ ते पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांना निरोप देण्यात येऊन त्यांची सपत्नीक मिरवणूक काढण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित निरोप समारंभात बोलताना एम राजकुमार म्हणाले की जिल्ह्यात एम पी डी एफ सारख्या ५६ कारवाया झाल्यावर दंगली सारख्या प्रसंगांना वेळीस नियंत्रणात आणता आले असे मनोगत एम राजकुमार यांनी व्यक्त करून जळगाव जिल्हा पोलीस दलाचे कौतुक केले त्यांची सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. तर नूतन पोलीस अधीक्षक एम सी व्ही महेश्वर रेड्डी यांचे जिल्हा पोलीस दलातर्फे स्वागत करण्यात आले.

 

मंगलम सभागृहात पार पडलेल्या या दोन्ही कार्यक्रमात व्यासपीठावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते चाळीसगावच्या अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर राजकुमार यांच्या पत्नी रम्या कन्नन आदी उपस्थित होते.

यावेळी नूतन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पूर्ण करण्यावर भर राहणार असून सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या सहकार्याने कामाची प्रेरणा घेऊन नावाधिक उंचावण्याचे त्यांनी सांगितले.

 

याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एम राजकुमार यांच्या फिटनेस विषयी अनेक उदाहरणे देऊन राजकुमार यांचे पोट कधी पुढे दिसले नाही आपले पोट मागे घ्या आणि मन मोठे ठेवून काम करत राहावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

 

या कार्यक्रमाला माजी महापौर जयश्री महाजन जीपचे माजी सदस्य प्रतापराव पाटील आयाज अली मुकुंद मेटकर चेतन वाणी आदींनी मनोगते व्यक्त केले सूत्रसंचालन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button