जळगाव : बुलढाणा जिल्ह्यात सोनसाखळीलांबविणाऱ्या प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडीत साबळे (वय ३१, रा. सुप्रिम कॉलनी) या चोरट्याच्या सोमवार दि. १२ रोजी एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याला पुढील कार्यवाहीसाठी बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील केशवनगर येथे शोभाबाई सुभाषराव खैरे (वय-६५) या वृद्ध महिला दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता खामगाव येथे दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन त्यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन धूमस्टाईल लांबवल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडित साबळे हा सुप्रीम कॉलनीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली.
त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नीलसिंग चव्हाण यांच्यासह एमआयडीसीचे दीपक जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकों गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, पोलीस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, छगन तायडे, राहुल रगडे, किरण पाटील, मुकेश
पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी प्रशांत साबळे याला अटक केली आहे.