चोपडा :- शहरातील रामकुमार नगर भागात एका शिक्षकाची गळ्यातील 51 हजार रुपये किमतीची संस्थाकडे गाअज्ञात दोन चोरट्यांनी दुचाकीवरून येत असताना वारा केल्याची घटना सात जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की रामकुवर नगर भागात राहणाऱ्या ज्योती चंदन पवार या शिक्षिका असून त्या आपली मुलगी सृष्टी पवार हिच्यासोबत रस्त्याने पायी घरी जात असताना
दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी ज्योती पवार यांच्या गळ्यातील सतरा ग्राम वजनाची 51 हजार रुपये किमतीची सोनसाखळी गळ्यातून तोडून हिसकावून नेत पोबारा केला हा प्रकार रात्री पावणेआठ वाजेच्या दरम्यान घडला. ही घटना घडल्यानंतर ज्योती पवार यांनी आरडा ओरड केली. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे करीत आहे.