जळगाव – इकरा शिक्षण संस्था संचलित एच जे थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरून जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग, राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “संविधान दिवस” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.चांद खान, उपप्राचार्य डॉ.शेख वकार, कार्यालयीन अधीक्षक अश्फाक पठाण, हे उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. तन्वीर खान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.साजिद मलक यांनी केले.या कार्यक्रमासाठी डॉ.राजेश भामरे, डॉक्टर युसुफ पटेल, डॉ.राजु गवरे, डॉ. फिरदौस शेख, डॉ.आयशा बासीत आदी हे उपस्थित होते. महाविद्यालयाचे विद्यार्थी , विद्यार्थींधी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संविधान दिनानिमित्त संविधान शपथ घेतली. त्यानंतर प्रा डॉ वकार शेख यांनी “संविधाना निमित्त आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. शेख हाफिज यांनी उपस्थितांचे आभार मानले.