खान्देशगुन्हेजळगांव

जळगावचा तरुण ‘एटीएस’च्या जाळ्यात, पाकिस्तानला पुरवली गोपनीय माहिती

खान्देश टाईम्स न्यूज | १४ डिसेंबर २०२३ | पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती देणाऱ्या एका तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अटक केली असून गौरव पाटील असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, संबंधित तरुण जळगावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

गौरव पाटील याने मुंबईच्या नेव्हर डार्क यार्डमध्ये सहा महिन्याचे प्रशिक्षण घेतले आहे. भारतातील प्रतिबंधक क्षेत्रातील गोपनीय समितीची माहिती ठाण्यातील एक संशयित देत असल्याची दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली होती. या पथकाने तांत्रिक पुराव्याच्या मदतीने गौरव पाटील याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याची एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ च्या दरम्यान फेसबुक आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून पाकिस्तानातील दोन हस्तकांशी त्याची ओळख निर्माण झाली होती. याच ओळखीतून त्याने माहितीच्या बदल्यात पैसे स्वीकारल्याचे तपासाअंती समोर आल्याने त्याच्या संपर्कात असलेल्या आणखी तिघांविरोधात युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींमध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांचा देखील समावेश असून तिसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. दरम्यान, गौरव याने आयटीआयचे शिक्षण घेतले असून नेव्हल डॉक यार्डमध्ये त्याने सहा महिन्याची अप्रेंटिसशिप करून नंतर त्याने ही महत्त्वपूर्ण माहिती शेअर केल्याचा संशय एटीएसला आहे. तो ठाणे परिसरात एका भाड्याच्या घरात राहत होता. नौदल आणि मुंबईतील काही प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय माहिती त्याने पुरवली होती. एटीएसने त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला ताब्यात घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button