खान्देशगुन्हेजळगांव

चोपड्यातील खून प्रकरणाचा २४ तासांत उलगडा : चालत्या रेल्वेतून आरोपी जेरबंद

चोपड्यातील खून प्रकरणाचा २४ तासांत उलगडा : चालत्या रेल्वेतून आरोपी जेरबंद

मुंबईपर्यंत पाठलाग; स्थानिक गुन्हे शाखेची  कारवाई, तांत्रिक विश्लेषणातून गुन्ह्याचा छडा

जळगाव (प्रतिनिधी) : चोपडा शहरात घडलेल्या खून प्रकरणाचा जळगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडा करत फरार आरोपींना अटक केली. विशेष म्हणजे, मुंबईपर्यंत पलायन केलेल्या आरोपींना पोलिसांनी नाशिक ते चाळीसगावदरम्यान चालत्या रेल्वेतून शिताफीने ताब्यात घेत कारवाईचा धडाका दाखवला.
१९ एप्रिल रोजी रात्री ते २० एप्रिल रोजी सकाळी दरम्यान चोपडा-धरणगाव मार्गावरील पाटचारी परिसरात प्रदीप राजेंद्र महाजन (वय ३३, रा. तारामती नगर, चोपडा) यांचा अज्ञात हत्याराने चेहरा व डोके ठेचून खून करण्यात आला होता. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान विजय भास्कर वैदकर (रा. भाग्योदय नगर) व निर्मल संजय बडगुजर (रा. चिंच चौक) यांनी संगनमताने हा गुन्हा केल्याचे उघड झाले.

मुंबईहून परतताना सापळा
गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाले होते. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे ते मुंबईला गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ रवाना झाले. दरम्यान आरोपी रेल्वेने जळगावकडे परत येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नाशिक येथून रेल्वेत बसून शोधमोहीम हाती घेतली आणि नाशिक ते चाळीसगावदरम्यान चालत्या रेल्वेतच आरोपींना ताब्यात घेतले.
चौकशीत कबुली
अटक केल्यानंतर सुरुवातीला आरोपींनी गुन्हा नाकारला; मात्र सखोल व विश्वासपूर्वक चौकशीत पूर्ववैमनस्यातून खून केल्याची कबुली त्यांनी दिली.

या  पथकाची उल्लेखनीय कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलीस हेडकॉन्स्टेबल रविंद्र पाटील, दीपक माळी, विलेश सोनवणे, विष्णू बिऱ्हाडे, सुनील दामोदरे, पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब पाटील तसेच चापोहेकॉ रिजवान शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले आणि पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी यांनीही तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button