खान्देशगुन्हेजळगांव

कानळदा जून्या भांडणावरुन तरुणाला बेदम मारहाण करून ब्लेडने वार

जळगाव :– जुन्या भांडणाच्या कारणावरून धीरज देविदास न्हावकर (वय २१, रा. कानळदा) या तरुणाला मारहाण करत ब्लेडने वार केले. ही घटना दि. १५ मार्च रोजी कानळदा येथे घडली.

या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील कानळदा येथील धीरज न्हावकर व गावातीलच चौघांमध्ये भांडण झाले होते. त्यावरून दि. १५ मार्च रोजी चौघांनी न्हावकर याच्या घरासमोर येऊन एका जणाने ब्लेडने तरुणाच्या उजव्या गालावर वार केला. तसेच अन्य तिघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी धीरज न्हावकर याने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अविनाश कांबळे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button