खान्देश टाइम्स न्यूज l ०३ मे २०२४ l अमळनेर l जळगाव लोकसभा मतदार संघातील अमळनेर तालुक्यातून करणदादा पाटील यांना सर्वाधिक लीड देवून विजयी करु, असा विश्वास अमळनेर तालुक्यातील विविध गावातील नागरिकांनी महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांना दिला.
करणदादा पाटील यांच्या प्रचारानिमित्त शुक्रवार, दि.३ रोजी अमळनेर तालुक्यातील ढेकु, शिरसाळे, तरवाडे, वावडे, जवखेडा, मांडळ, मुडी आणि बोदर्डे आदी गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी करणदादा पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून अनुक्रमणिका क्रमांक १ वरील मशाल चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले.
रॅलीत शिवसेनेच्या नेत्या ॲड. ललिता पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. व्ही. सुर्यवंशी, सुभाष पाटील, डॉ. अनिल शिंदे, संदीप घोरपडे, शाम पाटील, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील, दादा पवार, कारभारी आहेर, मनोज पाटील, चंद्रशेखर भावसार, नितीन नेवे, तालुका सचिव रामकृष्ण पाटील, सहसंघटक राजेंद्र पाटील गणेश पवार मुकेश राजपूत, लियाकत वायरमन, रियाज बागवान, डॉ. संचेती, नारायण पाटील, डॉ. साळुंखे, माजी सरपंच विनायक बडगुजर यांसह शेकडो ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.