गुन्हेजळगांव

भडगाव शहरातील मोटारसायकलसह चोरट्याला पकडले

 

खान्देश टाईम्स न्यूज l भडगाव प्रतिनिधी l तालुक्यातून व शहरातून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून गेल्या एका वर्षात अनेकांच्या मोटासायकल चोरीला गेल्याचे अनेक घटना शहरात घडल्या असून या याचा तंतोतंत छडा भडगाव पोलीसांनी लावला असून मुद्देमाल हस्तगत करुन व आरोपींना अटक करण्यात आली आली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, फेब्रुवारी महिन्यात भडगाव शहरातून होंडा शाइन व बजाज प्लॅटिना अश्या दोन मोटासायकल चोरी गेल्याची घटना घडली होती. या बाबत
भडगाव पोलीस स्टेशन गु.र.न. 89/2023 भादवि कलम 379 गुन्ह्याचा तपास करीत असताना सदर आरोपी नामे प्रकाश रामसिंग बागुल रा. वरखेडा ता. चाळीसगाव ह. मु. येवला रोड, नांदगाव ता. नांदगाव जि. नाशिक याचे बाबत गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने आरोपीची माहिती प्राप्त करुन त्याचा शोध घेत आरोपीस भडगाव पोलिसांनी नांदगाव येथे जाऊन सदर आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेऊन भडगाव पोलीस स्टेशनमध्ये आणले आरोपी कडे गुन्ह्याबाबत विचार पुस केली आरोपी प्रकाश बागुल याने सदर गुन्ह्याची कबुली देवुन सदर आरोपी कडुन दोन मोटारसायकली जप्त करण्यात आले आहे तेचे वर्णन पुढील प्रमाणे 1) होण्डा शाईन कंपनी ची मोटारसायकल क्र. MH 41, BB 039 तसेच 2) बजाज प्लँटीना काळ्या रंगाची मोटरसायकल क्र. MH 19 DJ 0373 अशा आरोपी कडुन जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा मा.चाळीसगाव परिमंडळ अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे मा. सहा.पोलीस अधीक्षक चाळीसगाव उपविभाग अभयसिंह देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शन खाली पो.हे.काँ. सचिन वाबळे हे करीत असून सदर गुन्ह्यातील आरोपी चा शोध मोहीम मध्ये पो.हे.काँ. सचिन वाबळे, पो.हे.काँ. विजय जाधव, पो.काँ.प्रविण परदेशी, पो.काँ.सुनिल राजपूत यांनी कामगिरी केली आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे ईश्वर पाटिल यांनी तांत्रिक मदत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button