खान्देश टाइम्स न्यूज | जकी अहमद | जळगाव शहरातील मोहाडी रस्त्यावर मुख्य चौकात असलेल्या हॉटेल गोल्डन नेस्टच्या नियमबाह्य बांधकामबाबत गेल्यवर्षी तक्रार अर्ज करण्यात आला होता. वर्ष उलटत आले तरी जळगाव मनपाच्या नगररचना विभागाने हॉटेलवर कोणतीही कारवाई केली नसल्याचे दिसून येत आहे.
जळगाव शहरात अनेक अनधिकृत आणि नियमबाह्य इमारती दिमाखात उभ्या आहेत. जळगाव मनपातील नगररचना विभागाच्या आशिर्वादानेच हे सर्व सुरु असून कोणीही कारवाई करण्यासाठी धजवत नाही. जळगाव शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या काही दुकानांवर तत्कालीन मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी कारवाई सुरू केली होती मात्र नंतर ते प्रकरण थंडावले.
नगररचना विभागातील भोंगळ कारभार, अधिकाऱ्यांची वादग्रस्त कारकीर्द, फायली फिरवणारे सेठ, दलाल यांच्याबाबतीत खान्देश टाइम्सने मालिका प्रकाशित केली होती. खान्देश टाइम्सच्या मालिकेनंतर अनेक मोठे फेरबदल झाले होते. काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या तर काहींचे अधिकार काढून घेण्यात आले होते.
जळगाव शहरातील मोहाडी रस्त्यावर असलेल्या हॉटेल गोल्डन नेस्ट संदर्भात गेल्यावर्षी एका तरुणाने तक्रार केली होती. पार्किंगच्या जागेत हॉलचे बांधकाम केल्याने रस्त्यावर वाहने उभी केली जातात असे त्यात नमूद होते. वर्ष उलटत आले तरी मनपा नगररचना विभागाने कोणतीच कारवाई केली नसल्याचे आता समोर येत आहे.
नगररचना विभागाने या इमारतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे अथवा कुणी बड्या व्यक्तीचा दबाव असल्याचा शक्यता व्यक्त होत आहे. दबक्या आवाजात तर २० किलो मिठाईची देखील चर्चा होऊ लागली आहे.