एरंडोल- जळगावकडून एरंडोलकडे जाणाऱ्या सिमेंटच्या टँकर वरील चालकाने नियंत्रण सुटल्याने टैंकर महामार्गालगत असलेल्या आसारीच्या दुकानात घुसून झालेल्या अपघातात चालक फुलचंद (पुर्ण नाव माहीत नाही) (वय २६, रा. चिलुला, ता. हैदरगड, जि. बाराबंकी) याच्यासह पादचारी ठार झाला. ही घटना मंगळवारी पहाटे अमळनेर नाक्याजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,जळगावकडून (एमएच १५, जेसी १९९५) क्रमांकाचा सिमेंटचा टैंकर मंगळवारी पहाटेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरुन भरधाव वेगाने जात होता. स्पीडब्रेकवर टँकरवरील चालकाने नियंत्रण सुटल्याने तो थेट महामार्गालगत असलेल्या आसारीच्या दुकानात शिरला. या अपघातात टँकरच्या कॅबिनचा चुराडा होवून चालक हा जागीच ठार झाला. तर रस्त्याच्याकडेने पायी जात जात असलेल्या शकील बागवान हा देखील टँकरच्या मागील चाकात येवून त्याचे दोघ पाय निकामी झाल होते. त्याच्यावर खासगी रुग्णालयता उपचार सुरु असतांना त्याचा देखील मृत्यू झाला. घटना उघडकीस येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.
अपघातात ठार झालेला शकील बागवान हा त्याच्या आईसोबत रात्री उशिरा एरंडोल येथे परतले होते. दोघ मायलेक हे पहाटेच्या सुमारास महामार्गाच्या कडेने पायी जात असतांना त्यांच्यावर दुर्दैवी काळाने झडप घातली. या अपघातात मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला तर त्याची आई बालंबाल बचावली.