जळगाव:- येथील इकरा शिक्षण संस्था द्वारा संचलित एच. जे. थीम कला विज्ञान महाविद्यालय मेहरून येथील विद्यार्थी उमेर शेख बिस्मिल्ला या खेळाडूची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ शरीर सौष्ठव स्पर्धा करिता, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शरीर सौष्ठव संघात निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धा पंजाब विद्यापीठ येथे होणार आहेत त्याच्या या निवडीबद्दल ईकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार डॉ. इक्बाल शाह, प्राचार्य डॉ. चांद खान, उपप्राचार्य डॉ. वकार शेख, उपप्राचार्य डॉ. तनवीर खान, तसेच सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी , खेळाडू यांनी शुभेच्छा दिल्या.