जळगाव : शिरसोली तेजळगाव दरम्यान, डाऊन रेल्वे लाईनवरील खांबा क्रमाक ४१२/३१ जवळ दि. २७ रोजी सायंकाळच्या सुमारास अंदाजे ६५ वर्षीय अनोळखी वृद्धाने रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केली. याप्रकरणी लोको पायलट यांनी घटनेची माहिती उपस्टेशन प्रबंधक एस. एल. रोडगे यांना दिली. त्यांनी लागलीच घटनेची
माहिती तालुका पोलिसात खबर दिली, त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केला. मयताच्या अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि धोतर परिधान केले आहे. तरी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन तपासधिकारी पोहेकॉ अनिल फेगडे यांनी केले आहे.