
फैजपूर येथील जनतेचे प्रेम कायम स्मरणात राहील
निरोप समारंभामध्ये अन्नपूर्णा सिंह यांचे मनोगत
फैजपूर प्रतिनिधी I फैजपूर विभागात सहा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असतांना जनतेचे मिळालेले प्रेम आणि सहकारी यांची साथ कायम स्मरणात राहणार असल्याचे सहा पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी निरोप समारंभा प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
श्रीमती सिंह यांची अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाल्याने त्यांना रावेर, सावदा, फैजपूर, यावलं, निंभोरा या पोलीस स्टेशन कडून निरोप देण्यात आला.
यावेळी सावदा येथील कुलसूमबाई सभागृहात झालेल्या कार्यक्रमात भुसावळ विभागाचे पोलीस उप अधीक्षक कृष्णान्त पिंगळे, रावेर तहसीलदार बंडू कापसे, यावलं तहसीलदार मोहनमाला नाझीरकर रावेर पोनि डॉ विशाल जयस्वाल, यावल पोनि प्रदीप ठाकूर, सावदा सपोनि विशाल पाटील, निंभोरा सपोनि हरिदास बोचरे, सपोनि अंकुश जाधव, घनश्याम तांबे, फैजपूर पी एस आय मैनुद्दीन सय्यद,नीरज बोकील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कृष्णान्त पिंगळे डॉ विशाल जयस्वाल पोनि प्रदीप ठाकूर यांनी देखील आपले अनुभव सांगितले.